नमस्कार, अध्यात्मिक ज्ञानाचा अनमोल ठेवा अर्थात JK Bhakti मध्ये आपले स्वागत आहे.

भूतलावरील सर्व प्राणीमात्रांमध्ये मनुष्य हा सर्वश्रेष्ठ समजला जातो. सारासार विचार करण्याची बुद्धिमत्ता त्याच्याकडे असते. असे असले तरीही आपण पाहतो की सर्वच जण आपल्या बुद्धीचा सुयोग्य वापर करतातच असे नाही. सदसद्विवेकबुद्धीने सत्कर्माचे आचरण केले तर जीवन सफल होऊन आंतरिक समाधान लाभते. मानवी देह हा नश्वर आहे परंतु या मानवी देहाला ईश्वराची साथ लाभली तर जीवन किती सुखदायी आणि मौल्यवान ठरेल. प्रत्यक्ष परमेश्वर जर त्याचा सोबती झाला तर ‘ जणू देह ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ‘ असा प्रत्यय आल्यावाचून राहणार नाही. मनुष्य जन्मामध्ये बालपण, तारुण्य आणि वार्धक्य या अवस्थांमधून मार्गक्रमण करत असतानाही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.

काहीजणांचे जीवन अगदी सुखमय असते तर काहीजणांना अतिशय खडतर, क्लेशदायक प्रसंगांना सामोरे जावे लागते. हे असे का बरे घडते. याचे उत्तर आहे पूर्वजांची पुण्याई आणि आपले कर्म आणि भगवंताची भक्ति. पूर्वजांची पुण्याई तर आपल्या हातात नसते. आपल्या हातात असते ते केवळ आपले कर्म आणि ते कर्म नुसते कर्म नव्हे तर सत्कर्म घडवायचे आपल्या हातात आहे. सत्कर्माची जोड असेल तर आयुष्य कसे अगदी हवेहवेसे वाटते कारण त्याचे फलित असते निखळ परमानंद आणि अलौकिक समाधान. आपल्या हातून सत्कर्म घडवायचे असेल तर हरिकथा श्रवण-पठण करत, नामस्मरण करत संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालावे लागेल. याच विषयाला धरून सुरुवात झाली ती JK Bhakti या समूहाची. संतांची शिकवण,आपले धर्मग्रंथ आणि भक्तांना आलेली अनुभूती जनमानसात पोहोचवून समाजाला भक्तिमार्गात आणण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे.

आम्ही आत्तापर्यंत अनेक धर्मग्रंथ (नवनाथ भक्तीसार, गुरुचरित्र, स्वामी चरित्र, शिवमहापुराण, गरुडपुराण, गजानन विजय, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र, नृसिंह सरस्वती चरित्र) भक्तांचे दत्तमार्गातील अनुभव, गिरनार परिक्रमा आणि गुरुशिखर दर्शन अनुभव यूट्यूबवर व्हिडिओ द्वारे भक्तांसाठी उपलब्ध करून दिले आहेत आणि त्यामुळे अनेक भक्त प्रेरित होऊन भक्ति मार्गात जोडले गेले आहेत. या वेबसाइट द्वारे आपण सर्व भक्त या कार्यात सामील होऊन आपले जीवन सफल करून भगवंताचा कृपाशिर्वाद मिळवण्यास पात्र होताल याची मला खात्री आहे.


आपले यूट्यूब चॅनल नक्की पहा.

Made For Marathi

JK Bhakti Marathi

आम्हाला follow करा

Facebook : दत्तदास

Instagram : दत्तदास

आपले अनुभव, अभिप्राय पाठवण्यासाठी  किंवा काही माहिती हवी असेल तर संपर्क करा : 
E-Mail : info@jkbhakti.in